'माझ्या नवऱ्याची बायको'मधील माया खऱ्या आयुष्यात आहे खूप बोल्ड, फोटो पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 14:10 IST2020-03-30T14:05:48+5:302020-03-30T14:10:34+5:30
Ruchira Jadhav

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
या मालिकेतील गुरूनाथ, राधिका, शनाया व सौमित्र या पात्रांनी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. त्यात आता या मालिकेत माया हे इंटरेस्टिंग पात्रदेखील पहायला मिळत आहे.
मायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचिरा जाधव साकारत आहे.
रुचिरा मालिकेत ज्या प्रमाणे ग्लॅमरस दाखवण्यात आली आहे. त्याप्रमाणेच ती खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आहे.
रुचिराने पराग विद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई येथून तिने पदवीचे शिक्षण घेतले.
कलर्स मराठी वाहिनीवरील 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली होती.
शुद्ध देसी या युट्यूब चॅनलवरील 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आहे.
'प्रेम हे', 'बे दुणे दहा', 'माझे पती सौभाग्यवती' अशा काही मालिकांमध्येही तिने काम केले आहे.
मालिकांशिवाय तिने नाटक आणि चित्रपटातही काम केलंय.
'बंच ऑफ रेड रोजेस' हे नाटक आणि 'लव्ह लफडे' या चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे.
रुचिरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
रुचिरा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.
मायाच्या भूमिकेतून रसिकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते आहे