Lokmat DCA: एमसी स्टेन ते शहनाज गिलपर्यंत रेड कार्पेवर दाखवला सेलिब्रेटींनी जलवा By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 03:21 PM 2023-02-23T15:21:08+5:30 2023-02-23T16:00:56+5:30
Lokmat DCA: लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळा मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात डिजिटल विश्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डिजिटल क्रिएटर्सना सन्मानित करण्यात आलं. रेड कार्पेटवर एमसी स्टेनपासून ते शहनाज गिलपर्यंत अनेकांनी आपला जलवा दाखवला. या अवॉर्ड सोहळ्यात बिग बॉस फेम शहनाज गिल ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच स्टनिंग दिसत होती. साऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होता.
एमसी स्टेन नेहमीप्रमाणेच, अवॉर्ड नाईटमध्येही कूल लूकमध्ये आपले कोट्यवधीचे दागिने फ्लॉन्ट करताना दिसला.
लॉक अप’(LockUpp)चा पहिला विजेता ठरलेला मुन्नवर फारुकीनेही रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.
'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील चिंगी उर्फ साईशा भोईरने आपल्या क्युटनेसनं सगळ्यांची मनं जिंकली.
अनुपमा फेम रुपाली गांगुलीने अवॉर्ड नाईटमध्ये आपल्या आईसोबत हजेरी लावली होती. गुलाबी रंगाच्या साडीत रुपाली सुंदर दिसत होती.
मराठी बिग बॉस फेम मीरा जगन्नाथ आपल्या स्टायलिश अदांजात दिसली.
लोकमत डिजिटल इन्फ्ल्युन्सर अवॉर्डमध्ये अभिनेते आशिष विद्यार्थीही रेड कार्पेटवर अवतरले होते. यावेळी त्यांनी अवॉर्डसह लोकांची मनं ही जिंकली