मिलिंद गवळी, माधवी निमकर आणि शशांक केतकरने गणपतीपुळ्याच्या गणपतीची कथा अक्षरशः जीवंत केली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 04:23 PM2024-09-02T16:23:14+5:302024-09-02T16:30:14+5:30

गणेशोत्सवाला एक आठवडा बाकी असताना स्टार प्रवाहवर गणेशोत्सव २०२४ हा विशेष कार्यक्रम पार पडला

स्टार प्रवाहवर गणेशोत्सवाला एक आठवडा बाकी असताना स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४ हा विशेष कार्यक्रम पार पडला

या कार्यक्रमात कलाकारांच्या खास परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी स्टार प्रवाहच्या कलाकारांनी गणपतीपुळ्याच्या गणपतीची कहाणी दाखवली

मिलिंद गवळी, शशांक केतकर, माधवी निमकर या कलाकारांच्या परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधलं. कलाकारांनी मंचावर गणपतीपुळ्याची कहाणी अक्षरशः जीवंत केली

आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध, मुरांबामधील अक्षय आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी यानिमित्ताने एकत्र आले

रंंगमंचावरील खास सजावट आणि गणपतीपुळ्याचा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

मिलिंद, शशांक आणि माधवी यांच्या या खास सादरीकरणाला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली.या तिघांनी परफॉर्मन्ससाठी घेतलेली मेहनत दिसून आली

स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४ चा हा खास सोहळा बघायचा राहिला असल्यास तुम्ही हॉटस्टारवर बघू शकता