Mugdha Vaishampayan shared photos of her and sister Mrudul s first Manglagaur
वैशंपायन बहिणींची पहिली मंगळागौर थाटात साजरी, मुग्धाने शेअर केले खास Photos By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:45 PM2024-08-12T13:45:39+5:302024-08-12T14:08:21+5:30Join usJoin usNext मुग्धा आणि मृदुल वैशंपायन या बहिणींची लग्नानंतरची पहिली मंगळागौर होती. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' मधून नावारुपाला आलेल्या पंचरत्नांपैकी दोन रत्न मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan ) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) गेल्यावर्षी लग्नबंधनात अडकले. मॉनिटर आणि मोदकाच्या या जोडीने ही आनंदाची बातमी देताच सगळेच जाम खूश झाले. डिसेंबर 2023 मध्ये मुग्धा आणि प्रथमेश यांचं लग्न झालं. तर त्यांच्या लग्नाच्या काही महिन्यांपूर्वीच मुग्धाची बहीण मृदुलही लग्नबंधनात अडकली. त्यामुळे दोघी बहिणींची यंदा पहिली मंगळागौर झाली. मुग्धाने पहिल्या मंगळागौरीचे खास फोटो शेअर केले आहेत. मुग्धाने केशरी साडी तर मृदुलने गुलाबी साडी नेसली आहे. दोघींच्या साड्यांमध्ये चिंतामणी रंगाचाही समावेश आहे. गळअयात मंगळसूत्र, नथ, पाटल्या, बांगड्या आणि केसांचा अंबाडा त्यात गजरा अशा पारंपरिक लूकमध्ये दोघी बहिणी अतिशय सुंदर दिसत आहेत. मुग्धाने पोस्ट केलेला तिचा सोलो फोटो तर खूपच खास आहे. यात ती अगदी तिच्या आईसारखीच दिसत असल्याची कमेंट एका चाहत्याने केली आहे. आणखी एका फोटोत देवघरासमोरील शिवपिंड आणि त्याभोवती केलेली फुलांची सजावट दाखवण्यात आली आहे. तर दुसऱ्या फोटोत दोघी बहिणी घरातील इतर महिलांसोबत वर्तुळ करुन मधोमध बसल्या आहेत. कोकणातील आरवली या त्यांच्या गावी वैशंपायन बहिणींची पहिली मंगळागौर अगदी थाटात साजरी झाली. आता त्यांच्या मंगळागौरीच्या खेळाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मुग्धा आणि प्रथमेश चाहत्यांचं लाडकं कपल आहे. मुग्धा २३ वर्षांची तर प्रथमेश २८ वर्षांचा आहे. तसंच दोघंही मराठी संस्कृती जपतात हे पाहून चाहत्यांना त्यांचं कौतुक वाटतं. या सुरेल जोडीने संपूर्ण प्रेक्षकांवर जणू भुरळच घातली आहे. टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी गाणीसेलिब्रिटीलग्नसंगीतTV CelebritiesMarathi SongsCelebritymarriagemusic