१७ वर्षांची असताना सेम टू सेम दिसायची 'तारक मेहता...' मधील बबिता! अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 03:13 PM2024-09-02T15:13:19+5:302024-09-02T15:34:12+5:30

तारक मेहता का उलटा चष्मामधील बबिता अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ताचे जुने फोटो व्हायरल झाले आहेत (munmun dutta, tarak mehta ka ooltah chashmah)

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सध्या सर्वांच्या आवडीची आहे. या मालिकेतील बबिताची भूमिका चांगलीच गाजतेय

तारक मेहता का उलटा चष्मामधील बबिता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. बबिता अर्थात मुनमुन दत्ताचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

मुनमुनने १७ वर्षांची असताना ती कशी दिसायची याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. बबिताचे हे फोटो केरळामधील आहेत

१७ वर्षांची असताना मुनमुन पहिल्यांदा कॅमेरासमोर सामोरी गेली होती. यावेळी तिने स्कोडा गाडीच्या जाहिरातीसाठी काम केले होते

मुनमुनने केरळा येथील नदीकिनारी या जाहिरातीचं खास शूटींग केलं होतं. १७ वर्षांची असताना मुनमुन आता दिसते तशीच दिसत होती अशा चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत

मुनमुन गेली १० हून अधिक वर्ष तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील बबिताच्या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे

तारक मेहता का उलटा चष्मामधील अनेक कलाकार सोडून गेले पण बबिताच्या भूमिकेत मुनमुन दत्ता गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय