my daughter saw me being beaten shweta tiwari breaks silence about 2 broken marriages
माझ्या मुलीनं मला मार खाताना पाहिलंय...! मोडलेल्या लग्नाबद्दल बोलताना श्वेता तिवारी झाली भावुक By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:11 PM2021-03-30T14:11:42+5:302021-03-30T14:31:49+5:30Join usJoin usNext श्वेता तिवारीनं मोडलेल्या 2 लग्नांबाबत सोडलं मौन टीव्हीवर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी श्वेता तिवारी हिला कोण ओळखत नाही़. आज ती टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हीच श्वेता एका मुलाखतीत तिच्या मोडलेल्या लग्नाबद्दल बोलली. श्वेताने ख-या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी तिने राजा चौधरीसोबत लग्न केले. पण राजाच्या छळाला कंटाळून तिने त्याला घटस्फोट दिला. यानंतर अभिनव कोहलीसोबत तिने दुसरा संसार थाटला. पण हे दुसरे लग्नही फार काळ टिकू शकले नाही. पहिल्या पतीपासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर दुस-या पतीपासून रियांश नावाचा मुलगा. मुलीने आपल्या आईचा संसार मोडताना, तिला मारहाण होताना बघितले आहे. श्वेता यावरच बोलली. ती म्हणाली, माझी लेक पलक हिने मला मारहाण होताना पाहिले आहे. पहिला पती मारहाण करायचा. पहिल्या लग्नावेळी आईने मला खूप समजावले होते. पण मी पळून जाऊन पहिले लग्न केले होते. आंतरजातीय विवाह करणारी आमच्या घरातील मी पहिली मुलगी होते.वयाच्या 18 व्या वर्षी मी लग्न केले आणि 27 वर्षी माझा घटस्फोट झाला. घटस्फोट झाला तेव्हा पलक फक्त 6 वर्षांची होती. वडिलांच्या वागण्याचा तिच्या मनावर काय परिणाम होईल, याची चिंता मला खात होती. वडिल आईला मारहाण करतात, हे तिने पाहिले होते. परस्त्रिया घरात येतात, हे तिने पाहिले होते. पोलिस घरी येत आहेत, हेही तिला समजत होते, असेही पुढे ती म्हणाली. आता माझा मुलगा रियांश तो सुद्धा यातून जातोय. त्यालाही पोलिस, न्यायाधीश माहित आहे. फार कमी वयात माझ्या मुलांनी खूप काही सहन केले. पण त्यांनी कधीच धीर सोडला नाही. नेहमीच हसत हसत त्यांनी सर्व समस्यांचा समाना केला. ते दोघं त्यामुळे नाराज राहिले नाहीत, असेही ती म्हणाली. अनेकदा माझी मुलं माझ्यापासून त्यांच्या भावना लपवत असल्याचे मला जाणवते. मी यातून त्यांना कसे बाहेर काढू, त्यांना कसे सुरक्षित ठेवू मला कळत नाही. या वयात ते ज्या समस्यांमधून जात आहेत. त्याला केवळ मी जबाबदार आहे. मी माझ्या आयुष्यात चुकीच्या व्यक्तीला निवडलं त्यामुळे त्यांना हे सर्व सहन करावे लागतेय. ते दोघंही कितीही दु:खात असले तरीही त्यांच्या चेह-यावर नेहमीच हास्य असते, असेही तिने सांगितले. 4 अक्टूबर 1980 साली उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ़ येथे श्वेता तिवारीचा जन्म झाला. 2001मध्ये टीवी शो 'कहीं किसी रोज' सेमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 'कसौटी जिंदगी की' मालिकेतून प्रेरणा या मालिकेतून श्वेता तिवारीला खूप लोकप्रियता मिळाली. 'जानें क्या बात हुई', 'अदालत', 'सजन रे झूठ मत बोलो' आणि 'परवरिश' मालिकेतही झळकली. श्वेता तिवारी बिपाशा बसुसह मदहोशी आणि काही भोजपुरी सिनेमातही झळकली आहे. त्यानंतर सगळ्यात वादग्रस्त शो 'बिग बॉस-4'मध्ये श्वेता तिवारी स्पर्धक म्हणून सहभागी झाली.Read in Englishटॅग्स :श्वेता तिवारीShweta Tiwari