Navratri 2024: आरस्पानी सौंदर्य! अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या फोटोंची होतेय चर्चा, नेटकरी घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 13:17 IST2024-10-10T13:06:12+5:302024-10-10T13:17:09+5:30
मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'हे मन बावरे', 'अस्सं सासर सुरेख बाई' अशा मालिकांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

मृणाल दुसानिस ही मराठी मनोंरजन विश्वातील नावाजलेली नायिका आहे.
लग्नानंतर गेली अनेक वर्षे अभिनेत्री अमेरिकेत राहत असल्यामुळे तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता.
लवकरच मृणाल अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, नुकतंच अभिनेत्रीने स्टार प्रवाह नवरात्रोत्सवानिमित्त खास फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे.
नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी मृणालने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून सुंदर असे फोटो क्लिक केलेत.
फोटोंमध्ये मृणालचं खुललेलं सौंदर्य पाहून चाहत्यांनी तिच्यावर कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
गुलाबी नऊवारी, हातात हिरवा चुडा अशा लूकमध्ये अभिनेत्री दिसते आहे. मृणालचा हा पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.