निया शर्माचा हॉट अवतार चाहत्यांना लावतोय वेड! लेटेस्ट फोटोंचा सोशल मीडियावर कहर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:31 PM2024-05-30T17:31:38+5:302024-05-30T17:46:44+5:30

लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते.

ती नेहमी ग्लॅमरस अवतारातील फोटो चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.

चाहत्यांना तिचा बोल्ड अवतार खूप आवडतो आणि तिचा प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो.

यावेळी नियानं काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तिची बोल्ड स्टाईल दिसत आहे.

नियाने लाल लिपस्टिक, विंक आय लाइनर आणि डार्क मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

यात तिच्या तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदा पाहून तिचे चाहतेही प्रचंड खूश झाले आहेत. यातील तिच्या हॉट अदा चाहत्यांना अक्षरश: वेडं लावणाऱ्या आहेत.

2016 मध्ये 'सेक्सिएस्ट एशियन वुमन' हा किताब तिनं पटकावलेला आहे.

निया लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुहागन चुडैल' असं नियाच्या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत निया नवी भूमिका साकारताना दिसणार आहे.

चुडैल बनून निया ४ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करत आहे. तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ही हॉरर मालिका कलर्स वाहिनीवर लवकरच सुरू होणार आहे.