'हसताय ना? हसायलाच पाहिजे' निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकारांची फौज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 11:56 IST2024-04-06T11:52:12+5:302024-04-06T11:56:32+5:30
हसताय ना? हसायलाच पाहिजे : एक दोन नव्हे तर...; निलेश साबळेच्या शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' मधील 'इतके' कलाकार

"हसताय ना? हसायलाच पाहिजे..." असं म्हणत 'चला हवा येऊ द्या' या झी वाहिनीवरील कॉमेडी शोमधूननिलेश साबळे घराघरात पोहोचला.
प्रेक्षकांना आपुलकीने "हसताय ना?" असं विचारणारा निलेश साबळे आता त्याच नावाचा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कलर्स वाहिनीवरील 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा नवा कोरा शो घेऊन निलेश साबळे पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर आता निलेश साबळेने 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोमधून त्याची नवी इनिंग सुरू केली आहे.
निलेश साबळेच्या या नव्या कोऱ्या कॉमेडी शोची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या शोसाठी त्याचे चाहतेही उत्सुक आहेत.
'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' मधील कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
या शोच्या प्रोमोमध्ये निलेश साबळेबरोबर भाऊ कदमही दिसले. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.
भाऊ कदमनंतर या शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदमची एन्ट्री झाली आहे.
'चला हवा येऊ द्या'मधून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता रोहित चव्हाणही निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये दिसणार आहे.
याबरोबरच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम हे कलाकारही 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोमध्ये झळकणार आहेत.