'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत बांधली जाणार नित्या-अधिराजची सात जन्मांची गाठ, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 02:49 PM2024-07-05T14:49:02+5:302024-07-05T15:22:12+5:30

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नित्या - अधिराजची लग्नगाठ बांधली असून त्याचे फोटो व्हायरल झालेत (sukh mhanje nakki kay asta)

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत सध्या नित्या - अधिराजच्या लग्नाची धामधूम सुरु आहे

नित्या - अधिराजच्या पारंपरिक लूकमधील लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

नित्या - अधिराजची भूमिकेत अनुक्रमे अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव दिसत आहेत

नित्या - अधिराजच्या लग्नासाठी खास फोटोशूट केलं. या फोटोशूटला लोकांची पसंती मिळालीय

नित्याने हिरव्या - लाल रंगाची साडी तर अधिराजने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केलाय

नित्या-अधिराज या दोघांनीही मुंडावळ्या बांधल्या असून जोडा एकमेकांना शोभून दिसतोय

नित्या-अधिराजच्या लग्नाचा दोन तासांचा विशेष भाग रविवार ७ जुलैला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर बघायला मिळेल