तुझ्यात जीव रंगला! 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्ताने राणादाची पाठकबाईंसाठी खास पोस्ट, म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 17:19 IST2024-02-14T17:12:25+5:302024-02-14T17:19:49+5:30
अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपं आहे.

अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते.
झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणा आणि अंजलीची भूमिका साकारत हे जोडपं घराघरात पोहोचलं. त्यात त्यांनी साकारलेल्या पाठक बाईंच्या आणि राणादाच्या जोडीने चाहत्यांना वेडच लावलं.
हार्दिक जोशी तसेच अक्षया देवधर २ डिसेंबर २०२२ मध्ये लग्न बंधनात अडकले. पाठकबाई आणि राणादाने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्याने चाहतेही आनंदी होते. खरंतर छोट्या पडद्यावरील मालिकेतून या जोडीला लोकप्रियता मिळाली.
आज 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्ताने हार्दिक जोशीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी अक्षयासाठी खास पोस्ट केली आहे. हार्दिकच्या या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
अक्षयासोबतच्या काही रोमॅंन्टिक फोटोंची मालिका शेअर करत त्याने त्यावर सूचक असं कॅप्शन लिहलंय.
"Celebrating the love that grows stronger with each passing day. Happy Valentine's Day, my beautiful wife! 💖" असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलंय.
तर अक्षयाने देखील तिच्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केलाय.