'पिंकीचा विजय असो' फेम अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा, बोल्ड फोटोशूट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 04:39 PM2024-07-12T16:39:03+5:302024-07-12T16:46:31+5:30

'पिंकीचा विजय असो' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

'पिंकीचा विजय असो' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. तिने शर्टमध्ये हे बोल्ड फोटोशूट केलं आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कल्याणी जाधव आहे. कल्याणीने 'पिंकीचा विजय असो' मालिकेत चित्रा धोंडे पाटील हे पात्र साकारलं होतं.

कल्याणी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.

आतादेखील तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या हॉटनेसची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

टीव्हीवर साडीमध्ये दिसणाऱ्या घरंदाज सूनेचा हा हॉटनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

कल्याणीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.