'देव माझा विठु सावळा...' 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्रीचा आषाढी एकादशीनिमित्त खास लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:19 IST2024-07-17T16:03:30+5:302024-07-17T16:19:05+5:30

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेने अभिनेत्री साक्षी गांधीला नवी ओळख मिळवून दिली.

या मालिकेत अवनी ही भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली.

सध्या साक्षी कलर्स मराठीवरील 'नवी जन्मेन मी' या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.

साक्षी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

सोशल मीडियाद्वारे साक्षी तिच्या प्रोफेशनल तर कधी वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर तिने खास फोटो स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.

गुलाबी रंगाचा कुर्ता त्यावर विठुरायाची सुंदर प्रतिकृती असा पेहराव तिने या दिवशी केला आहे.

दरम्यान, अभिनेत्रीने या पोस्टद्वारे देवशयनी आषाढी एकादशीच्या चाहत्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.