लग्नाच्या 10 महिन्यानंतर सई लोकूरचा हनिमून, शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 18:05 IST2021-09-30T17:59:38+5:302021-09-30T18:05:18+5:30
Sai Lokur : सई लोकूर आणि तीर्थदीप रॉयचे व्हेकेशन फोटो

‘मराठी बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय. पती तीर्थदीप रॉयसोबत सई धम्माल करतेय.
बॉलिवूड आणि अनेक मराठी सेलिब्रिटींचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन असलेल्या मालदीवमध्ये आता सई व तीर्थदीपही पोहोचले आहेत.
लग्नानंतर दहा महिने झाल्यानंतर हे कपल त्यांचं पहिल्या वहिल्या हनिमूनसाठी मालदीवला गेलं आहे.
सईने या हनिमूनचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोत सई बिकिनीत पोज देताना दिसतेय.
सई व तीर्थदीपने 30 नोव्हेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली होती. तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये सई लोकुर स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यादरम्यान पुष्कर जोगसोबतची तिची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती.
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली.
सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट ‘मिशन चॅम्पियन’मधून केली होती.