छोट्या पडद्यावरील संस्कारी सून खऱ्या आयुष्यात मात्र आहे खूपच बोल्ड, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 05:17 PM2024-09-03T17:17:42+5:302024-09-03T17:38:30+5:30

अभिनेत्रीचे बोल्ड फोटो बऱ्याचदा चर्चेत येत असतात.

झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर मुख्य भूमिकेत आहे.

अक्षयाने या मालिकेत वसुंधराची भूमिका साकारली आहे. या मालिकेत साधी भोळी दिसणारी वसुंधरा खऱ्या आयुष्यात मात्र खूप बोल्ड आहे.

अक्षया हिंदळकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.

अनेकदा अक्षया सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

अक्षया हिंदळकर कधी साडी तर कधी शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

अक्षयाचा फोटोंमधील बोल्ड अंदाज पाहून चाहतेही घायाळ होतात.

बऱ्याचदा अक्षराचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

अक्षयाचा फॅन फॉलोव्हिंग मोठा आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

अक्षयाने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. 'इश्काचा नादखुळा' या मालिकेतून ती घराघरात पोहचली.

याव्यतिरिक्त अक्षयाने 'साता जन्माच्या गाठी', 'सरस्वती' या मालिकेतही काम केले आहे.

अक्षया 'रॉकी' या सिनेमातही झळकली आहे.