'सारं काही तिच्यासाठी' साधीभोळी निशी ठरतीये अनेकांचं क्रश; फोटो पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 04:26 PM2024-05-29T16:26:40+5:302024-05-29T16:33:32+5:30

Dakshata joil:या मालिकेतील निशीला प्रेक्षकांनी विशेष पसंती मिळाली आहे. तिचा साधेपणा, सोज्वळपणा नेटकऱ्यांना भावत आहे.

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे सारं काही तिच्यासाठी. या मालिकेतील प्रत्येक कलाकार लोकप्रिय ठरला आहे.

या मालिकेतील निशीला प्रेक्षकांनी विशेष पसंती मिळाली आहे. तिचा साधेपणा, सोज्वळपणा नेटकऱ्यांना भावत आहे.

अभिनेत्री दक्षता जोईल हिने मालिकेत निशीची भूमिका साकारली आहे.

दक्षता अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. सारं काही तिच्यासाठी पूर्वी तिने सन मराठीवर काम केलं आहे.

आभाळाची माया या मालिकेत ती यापूर्वी झळकली आहे.

अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

निळ्या रंगाची साडी नेसून दक्षताने फोटोशूट केलं आहे. यात ती अत्यंत साधी आणि सोज्वळ दिसत आहे.