'जय मल्हार'मधील म्हाळसा उर्फ सुरभी हांडेच्या लाइफ पार्टनरचे फोटो पाहिलेत का?, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 19:20 IST2020-04-02T19:16:13+5:302020-04-02T19:20:41+5:30
Surbhi Hande

'जय मल्हार' या पौराणिक मालिकेतून अभिनेत्री सुरभी हांडे घराघरात लोकप्रिय झाली.
सुरभीने या मालिकेत म्हाळसाची भूमिका साकारली होती.
तिच्या या भूमिकेला रसिकांना भरभरून पसंती दिली होती.
त्यानंतर सुरभी 'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेत झळकली होती.
याशिवाय ती अग्गं बाई अरेच्चा 2 या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत पहायला मिळाली होती.
सुरभीने फेब्रुवारी, 2019मध्ये जळगावच्या दुर्गेश कुलकर्णीसोबत लग्न केले.
लग्नाआधी सुरभी व दुर्गेश खूप चांगले फ्रेंड्स होते. त्यानंतर त्यांनी मैत्रीचे रुपांतर रिलेशीपमध्ये करण्याचे ठरविले आणि त्यांच्या नात्याला घरातून परवानगीही मिळाली.
मग त्यांनी ऑगस्ट, 2019मध्ये एगेंजमेंट केली. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
सुरभीचा लग्न सोहळा चर्चेत आला होता.
कारण पुण्याजवळील ढेपेवाडा येथे चक्क पारंपरिक वारस जपणारा वाडा बांधण्यात आला होता. तिथे तिचे लग्न झाले होते.