Shefali jariwala kaanta laga girl turns 39 today lesser known facts
कांटा लगा गाणं वल्गर म्हणतं घराघरात झालं होतं बॅन, Shefali ला मिळाले होते केवळ 7000 रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 01:23 PM2021-12-15T13:23:21+5:302021-12-15T14:10:45+5:30Join usJoin usNext 2002 मध्ये कांटा लगा या गाण्याने शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हे नाव घराघरात पोहोचले होते. या गाण्यामुळे शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती.शेफालीने अनेक म्युझिक व्हिडिओ केले असले तरी लोक तिला 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखतात. 2002 मध्ये रिलीज झालेल्या या म्युझिक व्हिडिओने शेफाली जरीवालाचे नशीब बदलले. (Photo Instagram) शेफाली आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. शेफालीचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी अहमदाबादमध्ये झाला.आज तिची गणना स्टायलिश आणि बोल्ड अभिनेत्रीमध्ये केली जाते.(Photo Instagram) कांटा लगा हे गाणे जितके लोकप्रिय झाले, तितकीच त्यावर टीकाही झाली. लोकांनी याला अश्लील म्हटले, पण तरीही गाणं ऐकणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही.(Photo Instagram) रिलीज झाल्यापासून हे गाणे डिस्को, लग्न, पार्टी, ऑटोरिक्षापासून लोकांच्या रिंगटोनपर्यंत पोहोचले. .(Photo Instagram) कांटा लगा या गाण्यात शेफाली एक अश्लील मॅगझीन वाचताना दिसली होती. या कारणामुळे लोकांनी तिला वल्गर ठरवून घरात बॅन केले होते. (Photo Instagram) . एका मुलाखतीत शेफालीने सांगितले होते की, कांटा लगा या गाण्याने तिला प्रसिद्धी मिळवून दिली खरी पण तिने हे गाणं तिला खूप कमी पैसे मिळाले होते.(Photo Instagram) अमर उजालाच्या रिपोर्टनुसार शेफालीला 'कांटा लगा'साठी फक्त 7000 रुपये मिळाले. खुद्द शेफालीने एका मुलाखतीत ही माहिती दिली.(Photo Instagram) 'कांटा लगा' व्यतिरिक्त शेफालीने 'कभी आर कभी पार', 'माल भरी आहे' आणि 'प्यार हमसे किस मोड पे ले आया' सारख्या गाण्यांवर नृत्य केले आहे. शेफाली 'नच बलिए 5', 'नच बलिए 5' आणि 'बिग बॉस 13' मध्ये दिसली आहे..(Photo Instagram) 2014 मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. (Photo Instagram) Read in Englishटॅग्स :शेफाली जरीवालाShefali Jariwala