पिवळी नऊवारी साडी अन् चेहऱ्यावर खट्याळ हसू ; 'शुभविवाह' फेम अभिनेत्रीचा मराठमोळा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 05:14 PM2024-07-25T17:14:39+5:302024-07-25T17:20:07+5:30

स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' या मालिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडे मुख्य भूमिकेत दिसत आहे.

'जिवलगा' मालिकेमुळे मधुरा देशपांडे प्रसिद्धीझोतात आली.

त्यानंतर जवळपास ३ वर्षानंतर तिने मालिक विश्वात पुनरागमन केलं आहे.

सध्या मधुरा 'शुभविवाह' या मालिकेत भूमी नावाचं पात्र साकारत आहे.

नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्रीने तिचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये मधुराचा पारंपरिक लूक पाहायला मिळतो आहे.

व्हिडीओमध्ये नऊवारी साडी तसेच गळ्यात तन्मणी हार अन् केसात गुलाब असा पारंपरिक लूक तिने केला आहे.

अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.