अभिनेत्री श्वेता शिंदेने साडीमध्ये दिल्या अशा काही पोज, सौंदर्य गेलं आणखी खुलून By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 02:15 PM 2021-08-17T14:15:21+5:30 2021-08-17T14:18:44+5:30
रसिकांची मने जिंकणाऱ्या ‘लागीर झालं जी’या मालिकेची निर्मीती केली होती. यशस्वी निर्माती म्हणून श्वेता शिंदेने आपली एक ओळख निर्माण केली आहे. मराठी अभिनेत्री एक उत्तम निर्माती होऊ शकते हे श्वेतानं सिद्ध करुन दाखवलं आहे. मालिकाच नाही तर सिनेमातही तिने भूमिका साकारल्या आहेत.
'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदे हिने भूमिका साकारल्या होत्या.
‘लागीर झालं जी’ मालिकेची निर्मिती केल्यानंतर श्वेता पुन्हा अभिनयाकडे वळली त्यानंतर श्वेता 'डॉक्टर डॉन' या मालिकेत झळकली.
अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत श्वेता तितकीच सजग असते.
ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.
हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो श्वेता शिंदे सोशल मीडियावर शेअर करत असते.
या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात.
साडीमधला श्वेताचा लूक तितकाच घायाळ करणारा आहे.
दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते.
नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास श्वेता शिंदेच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.