SEE PICS : श्वेता तिवारीच्या घरातील वाद चव्हाट्यावर; पती अभिनवचा धिंगाणा, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 12:08 PM2020-11-05T12:08:19+5:302020-11-05T12:32:54+5:30

टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या कौटुंबिक आयुष्यातील वादांमुळे चर्चेत आहे.

टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या कौटुंबिक आयुष्यातील वादांमुळे चर्चेत आहे.

पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत दुस-यांदा संसार थाटला. पण काहीच वर्षांत दोघांमध्ये वाद सुरु झालेत.

आता श्वेता तिवारीच्या घरातील भांडणं चव्हाट्यावर आली आहेत. श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहली याने पत्नी आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचा आरोप केला आहे.

त्याने नुसता आरोप केला नाही तर श्वेता दार उघडत नसून गेल्या अनेक तासांपासून आपण श्वेताच्या घराबाहेर उभे असल्याचा पुरावा म्हणून सोशल मीडियावर एक लाईव्ह व्हिडीओही शेअर केला.

व्हिडीओमध्ये अभिनव कोहली वारंवार घराची बेल वाजवत असून घरात प्रवेश मिळावा यासाठी आरडाओरड करताना दिसतो आहे. इतकंच नाही तर अनेकदा दरवाजाही ठोठावत आहे. अभिनव कोहलीने इन्स्टाग्रामला व्हिडीओ शेअर केला आहे.

दरवाजा उघड, मला प्यारुला भेटू दे. हे तू का करत आहेस? असे तो जोरजोरात ओरडताना दिसतो आहे.

माझा मुलगा घाबरला आहे. आधी ती त्याला मला भेटू द्यायची. पण आता ती त्याला भेटू देत नाहीये. माझे पोर प्रचंड घाबरले आहे. आमच्या भांडणाचा माझ्या मुलाच्या मनावर वाईट परिणाम होतोय, असे अभिनव व्हिडीओत म्हणतोय. बिचारा आतमध्येच असेल...श्वेता घराबाहेर गेली असेल तर तिने मुलाला खोलीत बंद केले असेल. हीच सत्य परिस्थिती आहे,असेही तो म्हणतो आहे.

घरात श्वेताची आई, मुलगी पलक आणि तीन नोकर आहे. पण कोणी उत्तर देत नसल्याचे अभिवनने व्हिडीओत म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी अभिनवने श्वेतावर अनेक आरोप केले होते. श्वेता आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करतेय, असा आरोप त्याने केला होता. आता अभिनवने श्वेताला मानहानी नोटीस पाठवले आहे.

अलीकडे श्वेता कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. अशास्थितीत तिने मुलगा रेयांशला अभिनवकडे सोडले होते. मात्र यादरम्यान अभिनवने एक नवा आरोप केला होता. 25 ऑक्टोबरला श्वेता रेयांशला घेऊन गेली आणि यानंतर आपला मुलगा गायब आहे. श्वेताने त्याला अज्ञातस्थळी लपवल्याचे अभिनवने म्हटले होते.

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात श्वेता तिवारीने अभिनव कोहलीविरोधीत कौटुंबिक हिसाचाराची तक्रार केली होती.

श्वेताचे हे दुसरे लग्न आहे. याआधी अभिनेता राजा चौधरीसोबत तिचे लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून श्वेताला पलक नावाची एक मुलगी आहे.

यानंतर श्वेताच्या आयुष्यात अभिनव कोहलीची एन्ट्री झाली. दोघांना रेयांश नावाचा मुलगाही झाला. मात्र त्यानंतर त्यांच्या संसारात कुरबुरी सुरू झाल्या.

श्वेताने अभिनवविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

अभिनवने मुलगी पलकवर हात उचलल्याचा आणि तिच्याबद्दल अपशब्दांचा वापर केल्याचा आरोप श्वेताकडून करण्यात आला होता.

अभिनवने अर्थातच हे आरोप फेटाळून लावले होते. श्वेता तिवारी बिग बॉसमध्ये होती तेव्हा आपणच पलकचा सांभाळ करत होतो. श्वेता तिला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकणार होती. पण मी तिला थांबवल्याचे त्याने म्हटले होते.

मी पलकला आपल्या मुलीसारखे जपले. एक चांगला पती व पिता बनण्याचा प्रयत्न केला. पण आता श्वेता मला माझ्या मुलापासून दूर करतेय, असे अभिनवने म्हटले होते.

2001 मध्ये ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने श्वेताला खरी ओळख दिली. या मालिकेत तिने प्रेरणाची भूमिका साकारली होती.

2004 मध्ये बॉलिवूडमध्येही तिने पदार्पण केले. त्यावर्षी बिपाशा बासू स्टारर ‘मदहोशी’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा.

यानंतर आबरा का डाबरा, मिले ना मिले हम या चित्रपटांतही ती झळकली. याशिवाय अनेक भोजपुरी सिनेमांतही तिने काम केले.