हिच्यासोबत लग्न करुन आयुष्यात सर्वात मोठी चुक केली, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्यानेच केला होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 02:06 PM2021-08-04T14:06:02+5:302021-08-04T15:11:54+5:30

रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत.

लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये श्वेता तिवारी गणली जाते.

श्वेताने एकदा नाही तर दोनदा लग्न केलं.मात्र दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत.

अभिनव कोहलीसह श्वेता दुसऱ्यांदा रेशीमगाठीत अडकली होती.

मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.

श्वेताला अभिनव पासून एक मुलगा आहे तर, पहिल्या लग्नापासून मुलगी पलक तिवारी आहे.

श्वेता एकटीने दोन्ही मुलांचा सांभाळ करते.

घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे श्वेताने सांगितले होते.

अखेर श्वेता अभिनव कोहलीपासून वेगळी झाली.

अभिनव कोहलीनेही श्वेताबद्दल धक्कादायक खुलासे करत तिच्यावर आरोप केले होते.

श्वेतासोबत लग्न करणे आयुष्यातली सर्वात मोठी चूक केल्याचे सांगत त्याने श्वेताबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.