आता काय करते 'सोनपरी'मधील फ्रुटी? २0 वर्षांत झालाय इतका बदल, मराठी सिनेमांतही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 04:53 PM2024-09-02T16:53:36+5:302024-09-02T17:09:57+5:30

'सोनपरी'मध्ये अभिनेत्री तन्वी हेगडे फ्रुटीच्या भूमिकेत दिसली होती. बालकलाकार असलेल्या तन्वीने लडिवाळ अभिनेयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

टीव्हीवरील अनेक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'सोनपरी'. २०००-२००४ मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं.

या मालिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सोनपरीची भूमिका साकारली होती. तर सोनपरीमधील फ्रुटीही प्रेक्षकांना भावली होती.

'सोनपरी'मध्ये अभिनेत्री तन्वी हेगडे फ्रुटीच्या भूमिकेत दिसली होती. बालकलाकार असलेल्या तन्वीने लडिवाळ अभिनेयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

'सोनपरी'मुळे तन्वी प्रसिद्धीझोतात आली होती. त्यानंतर शाहिद कपूरच्या 'लाइफ हो तो ऐसी' या सिनेमात ती झळकली होती.

तन्वीने अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. शिवा, अथांग, धुरंधर भटावडेकर या सिनेमातही ती दिसली होती.

२०२१ मध्ये अलिप्तमध्ये ती शेवटची दिसली होती. आता सध्या ती लाइमलाइटपासून दूर आहे. ती सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नसते.

नुकतंच तिने मृणाल कुलकर्णी आणि अशोक लोखंडे यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. आता २० वर्षांनंतर तिच्यात खूप बदल झाल्याचं दिसत आहे.