पटत नसेल तर बघू नका, कोणी तुमच्यावर बंदूक ताणलेली नाही...! ‘बिग बॉस’ला ‘वादग्रस्त’ म्हणणा-यांवर बरसली सृष्टी रोडे By रूपाली मुधोळकर | Published: October 9, 2020 08:00 AM 2020-10-09T08:00:00+5:30 2020-10-09T09:37:04+5:30
‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त म्हणून हा शो ओळखला जातो. पण ‘बिग बॉस 12’ची स्पर्धक राहिलेली अभिनेत्री सृष्टी रोडे हिला मात्र... ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो आणि वादांचे जुने नाते आहे. अनेकदा हा शो वादात सापडला. म्हणूनच टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त म्हणून हा शो ओळखला जातो. पण ‘बिग बॉस 12’ची स्पर्धक राहिलेली अभिनेत्री सृष्टी रोडे हिला मात्र या शोमध्ये काहीही वाईट दिसत नाही.
‘बिग बॉस’ सारखा शो भारतीय संस्कृतीसाठी घातक आहे, भारतीय संस्कृतीची मूल्ये पायदळी तुडवणारा आहे, असा आरोप पूर्वापार होत आला आहे. सृष्टी रोडेने एका ताज्या मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली.
‘ई-टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सृष्टी यावर बोलली. ‘बिग बॉस’ हा शो भारतीय संस्कृतीची पायमल्ली करणारा शो आहे, असा आरोप होतो. तुझे यावर काय मत आहे, असे सृष्टीला विचारण्यात आले. यावर मला असे अजिबात वाटत नाही, असे ती म्हणाली.
‘बिग बॉस’ भारतीय संस्कृतीची पायमल्ली करतोय, असे माझे तरी मत नाही. तुम्हाला तसे वाटत असेल तर तुमच्याकडे पर्याय आहे. पटत नसेल तर पाहू नका. तुम्हाला योग्य वाटते तेच पाहा, हा पर्याय कायम तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या कानशीलाला बंदूक लावून कोणी तुम्हाला ‘बिग बॉस’ पाहा, असे म्हणत नाहीये. तेव्हा इतका प्रॉब्लेस असेल तर बघू नका, असे सृष्टी म्हणाली.
‘बिग बॉस’ हा शो खरच एंटरटेनिंग आहे, असेही ती म्हणाली. ‘बिग बॉस 14’ म्हणजे यंदाचे सर्व स्पर्धक एंटरटेनिंग असल्याचेही ती म्हणाली. एजाज खान, रूबिना, अभिनव हे मस्त एंटरटेन करताहेत, असे तिने सांगितले.
निक्की तंबोलीबद्दलही ती बोलली. ती सुद्धा एंटरटेनिंग आहे. पण एंटरटेनिंग आणि इरिटेटिंग यांच्यात खूप धूसर सीमा रेषा आहे, असे सृष्टी म्हणाली.
सृष्टी रोडेने ब-याच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘ये इश्क हाय’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. तिची ‘शोभा सोमनाथ की’ मालिका खूप गाजली होती.
बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये सृष्टी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या सीझनमध्ये तिने धम्माल परफॉर्मन्स दिला होता.
टेलिव्हिजनवरचा ती एक लोकप्रिय चेहरा आहे. तिची स्टाईल आणि बिनधास्त लूकसाठी ती ओळखली जाते.