standup comedian Munawar Faruqui wins Bigg Boss 17 trophy life journey know more about him
स्टँडअप कॉमेडियन, जेलची हवा ते Bigg Boss 17 Winner; असा आहे मुनव्वर फारुकीचा प्रवास! By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 01:19 AM2024-01-29T01:19:30+5:302024-01-29T01:27:34+5:30Join usJoin usNext What A Game! मुनव्वर फारुकी ठरला 'बिग बॉस'! बिग बॉस 17 फिनालेचा विजेता घोषित झाला आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली. विशेष म्हणजे मुनव्वरचा आज वाढदिवस असतानाच त्याला चाहत्यांकडून हे स्पेशल गिफ्ट मिळालं. 32 वर्षीय मुनव्वर फारुकीचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मात्र बिग बॉसमध्ये त्याला बघून अनेक जण त्याच्या प्रेमातच पडले. अचानक सोशल मीडियावर मुनव्वरची क्रेझ तयार झाली. सोशल मीडियावरील चाहत्यांचा हाच कल बघता मुनव्वरच जिंकणार हे जवळपास निश्चित झाले होते. मुनव्वरला प्राईज मनीमध्ये बिग बॉसची सुंदर ट्रॉफी, 50 लाख रोख रक्कम मिळाली आहे. शिवाय एक आलिशान कारही त्याला विजेतेपदात मिळाली आहे. मुनव्वरने प्रेक्षकांचं मन जिंकत अखेर ट्रॉफी पटकावलीच. कसा आहे मुनव्वरचा इथपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया मुनव्वरचं खूप कमी वयात लग्न झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे. पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच मुनव्वरला त्याच्या मुलाची कस्टडी मिळाली. मुनव्वरचे अफेअर्स नेहमीच चर्चेत राहिले आहेत. २०२२ साली त्याने कंगना रणौतच्या 'लॉकअप' या शोमध्ये सहभाग घेतला. इथेच त्याचं वैयक्तिक आयुष्य उघड झालं. घटस्फोटानंतर मुन्नवर आयेशा खान आणि नाजिया या दोघींना डेट करत होता. त्यातील आयेशा ही बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. प्रोफेशनली स्टँडअप कॉमेडियन असलेला मुनव्वर फारुकीने तुरुंगाचीही हवा खाल्ली आहे. 2021 मध्ये त्याने गृहमंत्री अमित शाह यांची खिल्ली उडवली होती. नंतर त्याला इंदोरमधून अटक करण्यात आली. जवळपास एक महिना तो जेलमध्ये होता. स्टँडअप कॉमेडीमध्ये त्याने अनेकदा हिंदू देवी देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. यामुळे त्याला जनतेच्या रोषालाही सामोरे जावे लागले. ३२ वर्षीय मुनव्वरचा जन्म गुजरातच्या जुमागढमध्ये झाला. 2002 च्या दंगलीत त्याचंही घर तोडण्यात आल्याचं त्याने सांगितलं आहे. नंतर तो कुटुंबासोबत मुंबईत आला. आईच्या निधनानंतर मुनव्वरने वयाच्या केवळ १३ व्या वर्षीच काम करायला सुरुवात केली होती. त्याची वडिलांचीही तब्येत बिघडल्याने घराची जबाबदारी त्याच्यावरच आली होती. आज मुनव्वरने बिग बॉस विजेतेपद जिंकत सर्वांना त्याची क्षमता दाखवून दिली आहे. सध्या त्याला चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. याचाच तो आता आनंद घेत आहे. यापुढे मुनव्वरसाठी अनेक संधी खुल्या झाल्या आहेत.टॅग्स :बिग बॉससलमान खानकलर्ससेलिब्रिटीBigg BossSalman KhanColors TVCelebrity