सुमोना चक्रवतीला तिचे फॅन्स म्हणतायेत, समुंदर मे नहाके और भी नमकीन हो गयी हो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 18:14 IST2020-05-15T18:14:27+5:302020-05-15T18:14:27+5:30

सुमोना चक्रवर्ती सध्या तिच्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे.
सध्या लॉकडाऊन असल्याने अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. सुमोनाने तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सुमोनाने बीचवरचे काही फोटो पोस्ट केले असून या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
सुमोनचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
मी माझे ते पूर्वीचे दिवस मिस करत आहे असे सुमोनाने या फोटोंसोबत लिहिले आहे.
सुमोनाने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
सुमोनाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात.
सुमोनाचे हे बीच वरील फोटो तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.