हॉलिवूडची हिरोईन! अक्षयाचं बोल्ड फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल "सुंदरा मनामध्ये भरली"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 18:25 IST2024-01-05T18:19:08+5:302024-01-05T18:25:38+5:30
अक्षयाने हॉट फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवरुन याचे फोटोही तिने शेअर केले आहेत.

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
नुकतंच तिने हॉट फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवरुन अक्षयाने याचे फोटोही शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अक्षयाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. गळ्यात मोत्याची माळ घालत अक्षयाने रेट्रो लूक केला आहे.
हे फोटो शेअर करत अक्षयाने नववर्षाच्या शुभेच्छा तिच्या चाहत्यांना दिल्या आहेत. अक्षयाचं हे नववर्षाचं बोल्ड फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
"तू छान आहेस", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "हॉलिवूडची हिरोईन" असं म्हटलं आहे.
अक्षयाने मराठीबरोबरच हिंदी कलाविश्वातही अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अक्षया झळकली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं.
तिने 'चूक भूल द्यावी घ्यावी' या झी वाहिनीवरील मालिकेतही काम केलं आहे. त्याचबरोबर 'सावधान इंडिया'मध्येही अक्षया झळकली होती.