PHOTOS: अभिनेत्री सुरभी तिवारीची अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी, लग्नाच्या तीन वर्षानंतर होतोय THE END By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 01:29 PM 2022-07-19T13:29:46+5:30 2022-07-19T19:04:57+5:30
Surbhi Tiwari Divorce: तीन वर्षांपूर्वी सुरभीने पायलट असलेल्या प्रवीण कुमार सिन्हासोबत लग्न केलं होतं. पण आता त्यांचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. तिने पतीवर घरगुती हिंसाचार आणि धमकावण्याचा आरोप केला आहे. प्रसिद्ध टीव्ही मालिका दिया और बाती हम फेम सुरभी तिवारी(Surbhi Tiwari) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खरं तर, अभिनेत्रीने यापूर्वी तिचा पती प्रवीणकुमार सिन्हा आणि सासरच्यांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी एक नवीन बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार लग्नाच्या तीन वर्षांनंतर सुरभी घटस्फोट घेतेय. दोघांचा तीन वर्षे पूर्वी प्रेमविवाह झाला होता.
सुरभी तिवारीचे हे प्रकरण जून महिन्यात समोर आले होते. सुरभीने 20 जून 2022 रोजी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये ' घरगुती हिंसा आणि धमकी' प्रकरणी IPC च्या कलम 498A आणि 377 अंतर्गत तिच्या पती आणि सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कारवाई केली नाही. याशिवाय तिने 12 मे 2022 रोजी अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.
सुरभी तिवारीचे पती प्रवीणकुमार सिन्हा पायलट आहेत आणि दोघेही २०१९ मध्येच लग्नाच्या बंधनात अडकले होते. काही महिने डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.
ऑक्टोबर 2018 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये काही बोलणे झाले पण सुरभीला प्रवीण आवडला नाही.
सुरभीने एका मुलाखतीत सांगितले होते की, दोघांमध्ये बोलणं सुरु झालं आणि प्रवीण लग्नापर्यंत पोहोचला होता.
पण मला लग्न करायचे नव्हते आणि म्हणून मी खोटे बोललो की आमची पत्रिका जुळत नाहीत.
सुरभी म्हणाली की प्रवीण खूप हुशार आहे आणि त्याने लगेच उत्तर दिले की मी आधीच पत्रिका बघितली आहे आणि दोघांची पत्रइका जुळतेय. मला त्याची ही गोष्ट आवडली आणि आमच्या भेटी-गाठी सुरु झाल्या. यादरम्यान मला प्रवीण जेंटलमन वाटला आणि मी लग्नाला हो म्हणाले.