जेठालाल ते बबिता! 'तारक मेहता'च्या कलाकारांचं शिक्षण किती माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 04:15 PM2022-01-02T16:15:02+5:302022-01-02T16:20:56+5:30

Taarak mehta ka ooltah chashma: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच या मालिकेतील कलाकारांचं शिक्षण किती आहे ते जाणून घेऊयात.

मुनमुन दत्ता - बबिता जी म्हणून जेठालालसह अनेकांच्या मनावर राज्य करणारी मुनमुन दत्ताने कोलकात्तामध्ये इंग्रजी विषयात मास्टर्स केलं आहे.

सोनालिका जोशी - सोनालिका जोशी म्हणजेच मालिकेतील माधवी भाभी हिने इतिहास विषयात बीए केलं आहे. तसंच फॅशन डिझायनिंग आणि थिएटरचा कोर्स पूर्ण केला आहे.

भव्य गांधी - टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीने कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केलं आहे.

अमित भट्ट - चंपकलाल जयंतीलाल गढा ही भूमिका साकारणारा अमित भट्ट बी कॉम झाला आहे.

दिशा वकानी - दयाबेन ही भूमिका तुफान लोकप्रिय करणारी दिशा वकानीने अहमदाबादमध्ये तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. गुजरात कॉलेजमधून तिने ड्रामेटिक्सचं शिक्षण घेतलं आहे.

शैलेश लोढा - तारक मेहता ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या शैलेशने बीएससी केल्यानंतर मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे.

दिलीप जोशी - जेठालाल या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले दिलीप जोशी उच्चशिक्षित आहेत. त्यांनी मुंबईतील केएनएम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स येथून बी कॉम केल्याचं सांगण्यात येतं.