'द कपिल शर्मा शो' फेम सुमोना चक्रवर्ती पूलमध्ये दिसली एन्जॉय करताना, पाहा व्हॅकेशन्सचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 15:16 IST2022-03-04T15:16:47+5:302022-03-04T15:16:47+5:30
The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा' शोमधील भूरी म्हणजेच सुमोना चक्रवर्ती(Sumona Chakravarti)ने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो द कपिल शर्माची भूरी म्हणजेच सुमोना चक्रवर्तीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुमोना सध्या हिमाचलमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुमोना चक्रवर्ती स्विमसूटमध्ये पूलमध्ये पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटो शेअर करत सुमोनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, पर्वतांवरील वाढते प्रेम. (फोटो: इंस्टाग्राम)
सुमोनाच्या व्हॅकेशनच्या फोटोंना चांगली पसंती मिळते आहे. चाहते या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुमोनाने तिच्या कारकीर्दीची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली आहे. तिने 'कसम से' मालिकेतून सुरूवात केली. त्यानंतर ती 'कस्तूरी,' 'नीर भरे तेरे नैना देवी,' 'सपनो से भरे नैना', 'बड़े अच्छे लगते हैं', 'कहानी कॉमेडी सर्कस की', 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या शोमध्ये झळकली आहे.
सुमोनाने बर्फी, किक आणि फिर से या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुमोना चक्रवर्तीच्या इंस्टाग्रामवर १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)