'माझी तुझी रेशीमगाठ'मधील परीचा पारंपारिक लूक, मायरा वायकुळ नववारी साडीत दिसली खूपच गोड!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 07:16 PM2022-08-27T19:16:38+5:302022-08-27T19:19:40+5:30

Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सोशल मीडियावर नेहमीच तिचे आणि तिच्या कुटुंबाचे गोड फोटो शेअर करत असते.

मायरानं नुकतंच नवं फोटोशूट केलं असून इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये मायरा वायकुळ हिने नववारी साडी नेसलेली दिसते आहे.

नव्या फोटोशूटमध्ये मायराने पारंपारिक लूक केला असून यामध्ये ती खूपच गोड दिसत आहे.

मायराने क्यूट क्यूट पोझ देत फोटोशूट केलं आहे.

मायराचे हे फोटो व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मायरा तिच्या गोंडसपणानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असते.