श्रेयसच्या रिअल लाइफ अश्विनीला पाहिलंत का? आहे खूपच साधीसुधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 01:31 PM2023-11-03T13:31:26+5:302023-11-03T13:36:37+5:30

Aditya vaidya: आदित्यची बायको सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही.

छोट्या पडद्यावर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली मालिका म्हणजे 'तू चाल पुढं'. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दिपा परब-चौधरी बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांसमोर आली.

या मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो.

या मालिकेतील अश्विनी आणि श्रेयस यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावते. त्यामुळे या दोन्ही कलाकारांच्या रिअल लाइफविषयी जाणून घेण्याचा चाहते प्रयत्न करत असतात.

यामध्येच मालिकेतील श्रेयस म्हणजेच अभिनेता आदित्य वैद्य याच्या पत्नीची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

आदित्य सोशल मीडियावर सक्रीय असून तो कायम त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

यात अलिकडेच आदित्यने त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तेव्हापासून त्याच्या पत्नीची चर्चा रंगली आहे.

आदित्यच्या पत्नीचं नाव प्राची गुप्ते-वैद्य असं आहे. प्राची कलाविश्वापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं.