'Pink City' जयपूरमध्ये प्रिया मराठेचा सफरनामा; शेअर केले नवऱ्यासोबतचे रोमॅंटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:01 IST2024-08-01T15:53:58+5:302024-08-01T16:01:29+5:30

हिंदीसह मराठी मालिका विश्वात प्रिया मराठेने आपल्या अभिनयाने चाहत्यांना आपलंस केलं.

गेल्या कित्येक वर्षापासून अभिनेत्री मनोरंजन विश्वात सक्रिय असल्याची पाहायला मिळते.

या 'सुखांनो या' पासून ते 'पवित्र रिश्ता' पर्यंत अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

त्यामुळे आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतो. प्रियाही कायम तिच्याविषयीचे अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच तिने जयपूरमधील ट्रीपचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती आपल्या पतीसोबत रोमॅंटिक अंदाजात दिसत आहे. शंतनु मोघेही फोटोंमध्ये डॅशिंग अंदाजात दिसत आहे.

जयपूरमधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत तिथे या कपलने काही फोटो क्लिक केले आहेत. व्हायरल फोटोंंमधील अभिनेत्रीचा साधा लूक नेटकऱ्यांना भावला आहे.

प्रियाने आजवर 'चार दिवस सासूचे', 'कसम से', 'या सुखांनो या', 'पवित्र रिश्ता', 'तू तिथे मी', 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'स्वराज जननी जिजामाता', 'येऊ कशी तशी मी नांदायला' यांसारख्या अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.