PHOTOS: 'तुझ्यात जीव रंगला'मधील सनी दा उर्फ राज हंचनाळेची पत्नी आहे खूप सुंदर, पहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 15:04 IST2020-03-24T14:51:11+5:302020-03-24T15:04:01+5:30
'तुझ्यात जीव रंगला'मधील सनी दा उर्फ राज हंचनाळे

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले.
या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे प्रचंड आवडते असून त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्यांना आवडते.
याच मालिकेतील सनी दा उर्फ राज हंचनाळे याची पत्नीदेखील खूप सुंदर दिसते.
त्याच्या पत्नीचं नाव मौली असून ते दोघे डिसेंबर, 2019मध्ये लग्नबेडीत अडकले.
खरेतर ते दोघेही वेगवेगळ्या राज्यातील आहेत. मौली ही हरयाणाची असून राज महाराष्ट्रातील आहे.
राजने सहा वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले.
2013 पासून राज आणि ती एकमेकांना ओळखतात.
राज आणि मौली दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.
त्यांच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
मौली ही स्केच आर्टीस्ट असून तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे स्केचदेखील शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वी राज व मौली गोव्यामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते