'तुमची मुलगी काय करते'फेम सावनीची आईदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'उंच माझा झोका'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 01:03 PM2022-01-27T13:03:54+5:302022-01-27T13:07:40+5:30

Jui bhagwat: जुईची आई अभिनेत्री असण्यासोबतच गायिका, सूत्रसंचालिकादेखील आहे.

अलिकडेच छोट्या पडद्यावर 'तुमची मुलगी काय करते' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या मालिकेत मधुरा वेलणकर, विद्या करंजीकर, गौरी कुलकर्णी, सतीश पुळेकर, हरीश दुधाडे असे अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत.

या कलाकारांसोबतच अभिनेत्री जुई भागवत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. तिने मधुराच्या लेकीची सावनी मीरजकर ही भूमिका साकारली आहे.

सध्या सोशल मीडियावर चर्चेत येणाऱ्या जुईची आईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

जुईच्या आईचं नाव दिप्ती बर्वे-भागवत असं असून ती अभिनेत्री असण्यासोबतच गायिका, सूत्रसंचालिकादेखील आहे.

'यात्रा', 'मोगरा फुलला', 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी', 'मेरे साई', 'स्वामिनी', 'पिंजरा', 'उंच माझा झोका' अशा अनेक चित्रपट, मालिकांमध्ये दिप्ती झळकली आहे.

जुईदेखील तिच्या आईप्रमाणे अभिनेत्री असण्यासोबत नृत्यांगना आणि गायिका आहे.

जुई माझिया प्रियाला प्रीत कळेना या लोकप्रिय मालिकेत बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती.

तसंच तिने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातही भाग घेतला होता.