कामातून ब्रेक घेत दुबईला गेली मराठी अभिनेत्री, शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:29 IST2024-12-17T15:11:18+5:302024-12-17T15:29:26+5:30
कामातून ब्रेक घेत आता धनश्रीने दुबई गाठली आहे. दुबई ट्रिपचे फोटो तिने शेअर केले आहेत.

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारून अभिनेत्री धनश्री काडगावकर घराघरात पोहोचली.
धनश्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. वैयक्तिक आणि करिअर अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.
कामातून ब्रेक घेत आता धनश्रीने दुबई गाठली आहे. दुबई ट्रिपचे फोटो तिने शेअर केले आहेत.
धनश्री दुबईत एन्जॉय करत असल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
दुबईच्या रस्त्यावर धनश्रीने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. "दुबई..." असं कॅप्शन धनश्रीने या फोटोंना दिलं आहे.
धनश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सध्या धनश्री 'बाप कुणाचा ताप कुणा...' या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.