अभिनेत्याला स्टेज ४ कॅन्सर! गेल्या तीन वर्षांपासून आजाराचा करतोय सामना, आता पैसेही संपले, झाली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:05 IST2025-03-06T10:36:49+5:302025-03-06T11:05:48+5:30
टीव्ही अभिनेत्री हिना खाननंतर आता आणखी एक अभिनेता कॅन्सर या गंभीर आजाराचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षांपासून टीव्ही अभिनेता कॅन्सरशी झुंज देत आहे.

टीव्ही अभिनेत्री हिना खाननंतर आता आणखी एक अभिनेता कॅन्सर या गंभीर आजाराचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षांपासून टीव्ही अभिनेता कॅन्सरशी झुंज देत आहे.
विभू राघव असं या अभिनेत्याचं नाव असून त्याला स्टेज ४चा कॅन्सर आहे. २०२२ मध्ये विभू राघवला कॅन्सरचं निदान झालं होतं.
व्हिडिओ शेअर करत त्याने चाहत्यांना त्याच्या या आजाराबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासून अभिनेता कॅन्सरशी झुंज देत आहे.
विभू राघव Colon Cancer (आतड्याचा कॅन्सर) ने ग्रस्त आहे. त्याचा कॅन्सर लास्ट स्टेजवर पोहोचला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून तो कॅन्सरवर उपचार घेत आहे. मात्र याचा खर्च जास्त असल्याने आता त्याच्याकडचे पैसेही संपले आहेत.
विभू राघवच्या उपचारासाठी आणि त्याला मदत व्हावी म्हणून आता सिनेइंडस्ट्रीतील कलाकार पुढे येत आहेत.
अभिनेत्री सिंपल कौल आणि दलजीत कौरने अभिनेत्याला मदत करण्यासाठी चाहत्यांना आवाहन केलं आहे.
याआधीही विभू राघवच्या मित्रांनी आणि कलाकारांनी त्याला पैशाची मदत केली होती. मात्र त्याच्या उपचारासाठी आणखी पैशांची आवश्यकता आहे.
विभू राघवने व्हिडिओत सांगितलं होतं की कॅन्सर त्याच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. लिव्हर, हाडे आणि फुप्फुसांपर्यंत कॅन्सर पसरला आहे.
यावर केवळ केमोथेरेपी हा एकमेव उपचार असल्याचं अभिनेत्याने सांगितलं होतं.
'निशा और उसके कझन्स' मालिकेत अभिनेता दिसला होता.