हिंदू पतीपेक्षा ८ वर्षांनी मोठी आहे मुस्लिम अभिनेत्री, लेकाला मौलाना टोपी अन् रुद्राक्षाची माळ घातल्याने झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 03:05 PM2024-09-06T15:05:39+5:302024-09-06T15:19:16+5:30

या जोडीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

अनेक सेलिब्रिटींनी आत्तापर्यंत आंतरधर्मीय विवाह केला आहे. अशीच एक अभिनेत्री जी मुस्लिम आहे आणि तिचा पती जो हिंदू असून तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे.

तर ही जोडी आहे किश्वर मर्चंट (Kishwer Merchant) आणि सुयश राय (Suyash Rai) . अभिनेत्री किश्वर मर्चंट आठ वर्ष लहान अभिनेता सुयश रायशी लग्न केलं. चाळीसाव्या वर्षी तिने मुलाला जन्म दिला. किश्वर अनेकदा पती आणि मुलासोबत फोटो शेअर करत असते नक्की कशी आहे तिची लव्ह स्टोरी जाणून घेऊया.

किश्वर मर्चंटचा जन्म इस्मायली मुसलमान कुटुंबात झाला. किश्वर मुंबईतच लहानाची मोठी झाली. तिने अनेक मालिका आणि रियालिटी शो मध्ये काम केलं आहे.

1997 साली किश्वरने शक्तिमान या मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं. यानंतर ती 'देश मे निकला होगा चांद','हातीम','कसोटी जिंदगी की' आणि 'खिचडी' अशा काही गाजलेल्या मालिकांमध्ये दिसली. 'मिले जब हम तूम', 'प्यार की ये एक कहानी' यात ती नवोदित कलाकारांसोबत झळकली.

गेल्या २७ वर्षांपासून किश्वर या इंडस्ट्रीत आहे. तिने बिग बॉस 9 मध्ये सहभाग घेतला होता आणि ती विजेतीही ठरली होती. बिग बॉसमध्येच अभिनेता सुयश रायही होता.

मात्र किश्वर आणि सुयशची ओळख 'प्यार की ये एक कहानी' मालिकेच्या सेटवरच झाली होती. 2010 मध्ये किश्वर आणि सुयश राय रिलेशनशिप मध्ये आले.

2016 मध्ये किश्वर आणि सुयश राय लग्न बंधनात अडकले 2021 मध्ये किशोर ने मुलाला जन्म दिला त्याचं नाव निर्वळ असं ठेवण्यात आलं.

नुकतंच एका मुलाखतीत किश्वर म्हणाली की, 'आमच्या प्रेमात कधीच धर्म आला नाही. सुयश हिंदू कुटुंबातून येतो पण त्याच्या बहिणीने सुद्धा एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं आहे. आमच्यात फक्त वयाचा अंतर हाच प्रॉब्लेम होता. यावरुन सुयशच्या आईने आधी विरोध केला होता मात्र मुलाच्या प्रेमापोटी नंतर त्यांनी होकार दिला'

मध्यंतरी किशोर मर्चंट ट्रोल झाली होती. तिने मुलाला मुलांना टोपी आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती यामुळे सोशल मीडियावर तिला बरंच स्ट्रोल केलं गेलं होतं.