बिकिनी अन् बेबी बंप, ३७ वर्षीय अभिनेत्री आहे जुळ्या लेकींची आई, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 03:59 PM2024-09-06T15:59:28+5:302024-09-06T16:12:13+5:30

अभिनेत्रीने बिकिनी घालत बेबी बंप फ्लॉन्ट केल्याचं दिसत आहे. प्रेग्नंन्सीमध्ये अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

अनेक अभिनेत्रींचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचे प्रेग्नंन्सी लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने बिकिनी घालत बेबी बंप फ्लॉन्ट केल्याचं दिसत आहे. प्रेग्नंन्सीमध्ये अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून रुबिना दिलैक आहे. रुबिनाने तिचे प्रेग्नंन्सीच्या काळातील जुने फोटो शेअर केले आहेत.

छोटी बहु या मालिकेतून रुबिना घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात रुबिनाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. सोशल मीडियावरुन तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती.

रुबिनाने तिच्या लेकींची नाव जीवा आणि एधा अशी ठेवली आहेत. अनेकदा ती मुलींबरोबरच फोटो शेअर करत असते.

रुबिनाने २०१८मध्ये अभिनव शुक्लाशी लग्नगाठ बांधत संसार थाटला. लग्नानंतर पाच वर्षांनी ते आईबाबा झाले.