वयाच्या ४३व्या वर्षीही हॉट दिसते श्वेता तिवारी, बाथरोब ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 02:18 PM2024-07-27T14:18:21+5:302024-07-27T14:20:50+5:30

श्वेताने बोल्ड फोटोशूट केलं आहे. बाथरोब ड्रेसमध्ये श्वेताने हे फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवरुन तिने हे फोटो शेअर केले आहेत.

'कसोटी जिंदगी की' या मालिकेतून अभिनेत्री श्वेता तिवारी प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये ती दिसली. श्वेताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

नुकतंच श्वेताने बोल्ड फोटोशूट केलं आहे. बाथरोब ड्रेसमध्ये श्वेताने हे फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवरुन तिने हे फोटो शेअर केले आहेत.

श्वेताने या फोटोंमध्ये पोझ दिल्याचं पाहायला मिळत आहे. श्वेताचे हॉट फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

४३ वर्षीय श्वेताच्या या सौंदर्य आणि ग्लॅमरपुढे भल्याभल्या अभिनेत्रीही फिक्या पडतील. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

श्वेता हा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिने'मेरे डॅड की दुल्हन', 'बेगुसराय', 'परवरिश', 'जाने क्या बात हुई' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉसमध्येही ती सहभागी झाली होती.

'इंडियन पोलीस फोर्स' या रोहित शेट्टीच्या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती. यामध्ये तिने विवेक ओबेरॉयच्या पत्नीची भूमिका साकारली होती.