"तो मला खूप मारायचा आणि घाणेरड्या शिव्या द्यायचा; मी माझं नातं वाचवण्यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:51 IST2025-01-08T16:39:41+5:302025-01-08T16:51:07+5:30
अभिनेत्रीने एक भयंकर अनुभव शेअर केला होता. तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला खूप मारहाण करायचा.

अभिनेत्री टीना दत्ता सध्या सिंगल आहे. पण आधी ती एका सीरियस रिलेशनशिपमध्ये होती.
टीना दत्ताने एक भयंकर अनुभव शेअर केला होता. तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला खूप मारहाण करायचा.
पाच वर्ष ती त्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. तो अभिनेत्रीला घाणेरड्या शिव्या देखील द्यायचा.
"मी जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मी माझं नातं वाचवण्यासाठी सर्व काही केलं. बॉयफ्रेंडचा मारही खाल्ला आहे."
"मी एका अशा नात्यात होती जिथे प्रत्येक दिवशी माझ्यासोबत चुकीचं वागलं जात होतं. तरीही मला त्याच्यासोबतच राहायचं होतं."
"जेव्हा तो मला माझ्या मित्रमैत्रिणींसमोर देखील मारायला लागला तेव्हा हद्दच झाली. मी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला."
"मला लव्ह मॅरेज करायचं होतं. पण असं काही झालं नाही. मला नेहमीच या गोष्टीचं दु:ख वाटत राहिल."
"हे नातं संपल्यानंतर आता मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून गेली आहे. आता मी एकटी आहे पण जास्त खूश आहे."
"आता मला कोणत्याच नात्यात माझा वेळ वाया घालवायचा नाही" असं टीना दत्ताने म्हटलं आहे.
अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.