फिल्म इंडस्ट्री, नैराश्य आणि आत्महत्या; तुनिषाच्या मृत्यूने पुन्हा आली 'या' प्रकरणांची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 12:36 PM2022-12-25T12:36:17+5:302022-12-25T12:42:54+5:30

टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या शूटिंग सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र यापुर्वीही अनेक सेलिब्रिटींनी अचानक जगाचा निरोप घेऊन धक्का दिला आहे.

यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे सुशांतसिंह राजपूत. सुशांतसारख्या इतक्या टॅलेंटेड अभिनेत्यानं आत्महत्या करणं यावर आजही कोणाचा विश्वास बसत नाही. १४ जून २०२० रोजी सुशांतने बांद्रा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री वैशाली टक्कर हिने १६ ऑक्टोबर २०२२ रोजी इंदूर येथे राहत्या घरी आत्महत्या केली.

कुशल पंजाबी देखील टीव्ही क्षेत्रातील मोठं नाव. २६ डिसेंबर २०१९ रोजी त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

दिल तो हॅपी है जी फेम सेजल शर्मा हिने २४ जानेवारी २०२० रोजी मुंबईतील घरी आत्महत्या केली.

टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवालने १५ मे २०२० रोजी वयाच्या ३२ व्या वर्षी आत्महत्या केली.

अभिनेत्री जिया खानने वयाच्या २५ व्या राहत्या घरी आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे समोर आले.

टेलिव्हिजन अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने २६ मे २०२० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेक्षाने क्राईम पेट्रोलच्या अनेक भागांत काम केले आहे.

बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने २०१६ मध्ये २४ व्या वर्षी आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले.