unknown things about Aggabai Sunbai fame uma pendharkar
जाणून घ्या ‘अग्गबाई सूनबाई’ मधील शुभ्रा म्हणजेच उमा पेंढारकरबद्दल या खास गोष्टी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 05:34 PM2021-03-12T17:34:27+5:302021-03-12T17:51:58+5:30Join usJoin usNext झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याऐवजी प्रेक्षकांना अग्गंबाई सूनबाई ही नवी मालिका पाहायला मिळत आहे. अग्गबाई सूनबाई या मालिकेत ‘शुभ्रा’ च्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा तर काहींसाठी नवखा वाटणारा उमा पेंढारकर हा चेहेरा दिसत आहे. मुळात एक काऊंसिलर असलेल्या उमाचा अग्गबाई सूनबाई पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. डोंबिवलीकर उमानं ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. अद्वैत दादरकारचे आई-बाबा शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिनं नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती पहिली आली. प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार मिळाला. आणि तोच क्षण उमाला रंगभूमीवर आणण्यासाठी पुरेसा ठरला तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक मिळालं. याखेरीज सायकॉलॉजीमध्ये उमानं मास्टर्स केलं आहे. त्यामुळे ती काउंसिलिंगचं काम मोठया जबाबदारीनं करते.टॅग्स :अग्गंबाई सूनबाईAggabai Sunbai