'वडील शिव्या द्यायचे अन् आई खूप मारायची', जीवन संपवणार होती उर्फी जावेद; सांगितली संपूर्ण कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 05:22 PM2023-02-24T17:22:26+5:302023-02-24T17:28:51+5:30

Urfi Javed : उर्फी जावेद तिच्या आउटफिटमुळे चर्चेत येत असते. मात्र नुकतेच तिने एका मुलाखतीत खासगी आयुष्यातील धक्कादायक खुलासे केले आहेत.

उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे आणि तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते.

उर्फी जावेद तिच्या आउटफिटमुळे ती सोशल मीडियावर ट्रोलच्या निशाण्यावर असते. तिने नुकतेच एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यातील धक्कादायक खुलासे केले आहेत. या दरम्यान तिचे बालपण कसे गेले ते सांगितले आहे.

उर्फीला बहुतेक वेळा कॅमेऱ्यासमोर हसताना पाहिलं असेल. पण पहिल्यांदाच अभिनेत्री तिच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल सांगितलं. उर्फीने डर्टी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती लखनऊमध्ये लहानाची मोठी झाली आहे. तिच्या पालकांना पाच मुले होती ज्यात ती दुसरी होती.

तिचे वडील तिला मारहाण करून शिवीगाळ करायचे. तिची आईही तिला मारहाण करायची. हे सगळे रोज ऐकावे लागायचे, असे उर्फीने सांगितले.

उर्फीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. ती म्हणाली की, मी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. माझे वडील प्रत्येक गोष्टीत बंधने घालायचे. पण त्यावेळी मी टीव्ही जास्त बघायचे. फॅशनकडे माझा नेहमीच कल राहिला आहे.

मला फॅशनची फारशी समज नव्हती पण मला काय घालायचे हे माहित होते. मला वेगळे उभे राहायचे होते. मी पार्टीला जायचे तेव्हा लोक माझ्याकडे बघायचे, असे उर्फी म्हणाली.

उर्फीने मुलाखतीत पुढे सांगितले की, तिला नेहमी पैशाची काळजी होती. ती मोठी होत असताना तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते. पण माझ्या मनात श्रीमंत मुलीचे स्वप्न फुलायचे.

स्त्रीने पुरुषाच्या मागे न धावता पैशाच्या मागे धावावे अशी तिची विचारधारा होती.

उर्फी जावेदला पहिल्यांदा करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी शोमधून लोकप्रियता मिळाली.

उर्फी जावेदचे इंस्टाग्रामवर ४.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.