Chandrika Dixit : "मला सलमानसोबत..."; चित्रपटात बोल्ड सीन्स करण्याबाबत 'वडा पाव गर्ल'ने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 04:04 PM2024-07-24T16:04:02+5:302024-07-24T16:20:13+5:30

Chandrika Dixit : दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकल्यानंतर चंद्रिका दीक्षितला आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत चित्रपटांमध्ये नाव कमवायचं आहे.

'वडा पाव गर्ल' अशी ओळख असलेली ​​चंद्रिका दीक्षित बिग बॉस OTT 3 मधून बाहेर पडली आहे. मात्र या शोचा भाग झाल्यानंतर चंद्रिका आता मनोरंजन विश्वात येण्याचं स्वप्न पाहत आहे.

दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकल्यानंतर चंद्रिका दीक्षितला आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत चित्रपटांमध्ये नाव कमवायचं आहे.

Filmygyan ला दिलेल्या एका मुलाखतीत चंद्रिकाला विचारण्यात आलं होतं की, जर तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तिला कोणासोबत काम करायला आवडेल?

यावर चंद्रिका दीक्षितने "जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच चित्रपटात काम करेन" असं म्हटलं आहे.

"मी आधी म्हटल्याप्रमाणे मला बोल्ड सीन्स करायला अजिबात आवडत नाही. मी जी कोणतीही व्यक्तिरेखा साकारेन ती अगदी उत्तमरित्या करेन."

"अभिनेता सलमान खानला भेटण्याची खूप इच्छा आहे" असं वडापाव गर्लने म्हटलं आहे.

यावर तिला विचारण्यात आलं की, तिला सलमान खानसोबत काम करायला आवडेल का? तर तिने मला नक्कीच त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे असं उत्तर दिलं.

'वडापाव गर्ल' अशी ओळख असलेली चंद्रिका आधी पूर्णवेळ नोकरी करायची. पण जेव्हा कोविडच्या काळात तिच्या मुलाची तब्येत बिघडली तेव्हा चंद्रिका आणि तिचा पती यश गेरा यांना नोकरी सोडावी लागली.

दोघांनीही आपल्या मुलाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनी दिल्लीत वडापावचा स्टॉल लावला आणि काही वेळातच त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

मुंबई स्टाईलमध्ये वडापाव विकण्याची चंद्रिका आणि तिच्या नवऱ्याची कल्पना एकदम जबरदस्त असल्याने लोकांची गर्दी होऊ लागली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चंद्रिका लोकप्रिय झाली.