बाबो 25 किलोचा लेहंगा घालून शूटदरम्यानच धावत सुटली अभिनेत्री, कारण वाचून व्हाल हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 04:40 PM 2021-06-12T16:40:30+5:30 2021-06-12T16:48:15+5:30
‘कुमकुम भाग्य’ मालिका रंजक वळणांमुळे रसिकांची आवडती मालिका आहे.‘कोवि़ड-19’ विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊनच्या काळात अभी आणि तनू यांच्या विवाहा नाट्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पण आता रणबीर आणि प्राचीचे लग्न निश्चित करताना कथानकाला आणखी नव्या कलाटण्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना रिया ही नववधूच्या वेशात पाहायला मिळेल.
तिचे लग्न रणबीरबरोबर होणार आहे. सर्वच नववधूंप्रमाणे तिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
मात्र या लेहेंग्याचे वजन तब्बल 25 किलो होते आणि एका प्रसंगासाठी हा भारी वजनाचा लेहेंगा परिधान करुन तिला धावायचे होते.
या प्रसंगाच्या चित्रीकरणानंतर पूजाकडे पाहिल्यावर कोणालाही वाटले असते की दिवसभर चित्रीकरण केल्यामुळे ती दमली आहे.
अर्थात तिच्याऐवजी बॉडी डबल वापरून वधावण्याचा हा प्रसंग साकारता आला असता, पण पूजाला हा प्रसंग अस्सल रंगवायचा असल्याने तिने स्वत:च या भरजरी लेहंग्यात धावण्याचा प्रसंग चित्रीत केला.
‘कुमकुम भाग्य’मध्ये रियाची भूमिका साकारणारी पूजा बॅनर्जीने हा अवजड पोशाख घालून धावताना येणा-या अडचणींबद्दल सांगितले.
या लग्नाच्या प्रसंगासाठी मला नववधूचा पोशाख परिधान करायचा होता. हा लालभडक रंगाचा सुंदर डिझायनर लेहेंगा परिधान करताना मला खूप आनंद झाला.
पण हा जड लेहेंगा घालून मला पळावं लागणार होतं. ती गोष्ट फारच कठीण होती. खरं सांगायचं, तर हा लेहेंगा खरंच खूप जड होता. त्याचं वजन जवळपास 25 किलो होतं.
त्याशिवाय मी लग्नाचे दागदागिने घातले होते. या प्रसंगाचं चित्रीकरण दोन-तीन दिवस सुरू होतं. तेव्हा मला दररोज दोन-तीन तास या नववधूच्या रूपात सजण्यासाठी घालवावे लागत होते.
कुमकुम भाग्यच्या सेटवर जाण्यासाठी पायर-या चढणं आणि नंतर काही प्रसंगासाठी या वेशात धावणं हे मोठं कठीण काम होतं.
पण मला हा प्रसंग परफेक्ट झाला पाहिजे असं वाटत होतं आणि म्हणून मीच त्याचं चित्रीकरण केलं. पण माझे सारे कष्ट सार्थकी लागले.
मला तो लेहंगा घालून वावरणं खूप छान वाटत होतं. लग्नाच्या या सा-या प्रसंगाचं चित्रीकरण करताना खूप मजा आली.