Which celebrity was previously featured in 13 episodes of Bigg Boss?
याआधी बिग बॉसच्या एकूण 13 एपिसोडमध्ये कोणते सेलिब्रिटी ठरले होते विनर? By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:37 PM2020-02-17T12:37:51+5:302020-02-17T15:23:23+5:30Join usJoin usNext हिंदी 'बिग बॉस'च्या तेराव्या पर्वाची प्रचंड चर्चा झाली. या पर्वाच्या विजेत्याचं नावही घोषित झालं आहे. आज आपण 'बिग बॉस' च्या १३ विजेत्यांची नावे जाणून घेणार आहोत. बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय बिग बॉस सीझन १ चा विजेता होता. हा सिजन सोनी मनोरंजन वाहिनीवर प्रसारित झाला. या पहिल्या पर्वाचे होस्टींग अभिनेता अरशद वारसी यांनी केले होते. बिग बॉसचा दुसरा पर्व २००७ मध्ये प्रसारित झाला असून या शोचं होस्टींग अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने केले होते आणि या शोचा विजेता होण्याचा मान आशुतोष कौशिक याने पटकवला होता. बिग बॉस सी़जन ३ चा विजेता विंदू दारा सिंग होता, या तिस-या पर्वाचे होस्टींग अभिनेता अमिताभ बच्चन यांनी केले होते . बिग बॉसचे तिसरे पर्व हे 2009 मध्ये कलर्स टीव्हीवर प्रसारित झाले बिग बॉस सी़जन 4 ची विजेती श्वेता तिवारी होती. या शोची ती पहिली महिला विजेती होती..या चौथ्या पर्वाचा होस्ट सलमान खान होता. बिग बॉस सी़जन ५ मध्ये संजय दत्त आणि सलमान खान यांनी होस्ट केले होते. या सीझनची विजेती टीव्ही अभिनेत्री जूही परमार होती. बिग बॉस सी़जन ६ ची विजेती उर्वशी ढोलकिया होती. बिग बॉस सी़जन ७ ची विजेती गौहर खान होती बिग बॉस सी़जन ८ चा विजेता गौतम गुलाटी होता. बिग बॉस सी़जनच्या ९ व्या पर्वाचा विजेता प्रिन्स नरूला होता , तर बिग बॉस ९ जिंकण्यापूर्वी प्रिन्सने इतर अनेक रिऍलिटीशोचे विजेतेपद जिंकले. बिग बॉस सी़जन १० , मध्ये मनवीर गुज्जरने बाजी मारली होती. शिल्पा शिंदे ११ व्या सी़जनची विजेती होती. १२ व्या पर्वाची दीपिका कक्कर विजेती होती. नुकताच पार पडलेला बिग बॉस सीझन १३ हा इतिहासातील सर्वात मोठा सीजन ठरला असून सिद्धार्थ शुक्ला या शो चा विजेता झाला , तर असिम रियाज या स्पर्धेचा उपविजेता ठरला.टॅग्स :बिग बॉससिद्धार्थ शुक्लागौरी खानसलमान खानप्रिन्स नरूलाBigg BossSidharth ShuklaGauri khanSalman KhanPrince Narula