मी सेटवर फक्त रडायचे..., मालिकांमध्ये अभिनय करणं का सोडलं? उर्मिला निंबाळकरने सांगितलं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 01:07 PM 2023-01-30T13:07:33+5:30 2023-01-30T13:16:03+5:30
Urmila Nimbalkar : 'दुहेरी', 'बन मस्का' या मराठी मालिकांमधून उर्मिला निंबाळकर घराघरात पोहोचली. अर्थात आताश: उर्मिला फारशी टीव्हीवर दिसत नाही. याचं कारण काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो... प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर नेहमीच आपल्या नवनवीन पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
उर्मिला प्रसिद्ध युट्यूबर असण्यासोबतच एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील आहे. तिने एक तारा, दिया और बाती या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
'दुहेरी', 'बन मस्का' या मराठी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली. अर्थात आताश: उर्मिला फारशी टीव्हीवर दिसत नाही. याचं कारण काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो.
आता उर्मिलाने याचं उत्तर दिलं आहे. नुकतंच थिंक बँक' या युट्युब चॅनलला उर्मिलानं एक मुलाखत दिली. या मुलाखतीत मालिकांपासून दूर जाण्याचं कारण तिने सांगितलं.
ती म्हणाली, 'मी मालिकांमध्ये दिवसाचे १३ तास कमीतकमी तर १७ ते १८ तास सलग शूटिंग करायचे. सगळ्याच मालिकांच्या बाबतीत असंच आहे, इतकंच काम करावं लागणार, असं माझ्या लक्षात आलं.'
ती पुढे म्हणाली, ' सलग १७ ते १८ तास शूटींगचा तब्येतीवर परिणाम जाणवू लागला होता. अगदी आजारी पडलं तरी गोळ्या खाऊन, सलाईन लावून काम करायला लागायचं.'
ती म्हणाली, 'मला भरपूर काम मिळत होतं पण मला ते करायचं नव्हतं. अशा पद्धतीने काम करणं मला मान्य नव्हतं. त्यात ना आनंद होता, ना स्वत:चं वेगळं आयुष्य होतं.'
'मी ते काम करून अजिबात खुश नव्हते, मी सेटवर जाऊन फक्त रडायचे. आईबाबांना कायम मला दवाखान्यात भेटायला यायला लागायचं. त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला,' असं तिने सांगितलं.
आता उर्मिला एक लोकप्रिय युट्यूबर म्हणून ओळखली जाते. युट्यूबवर तिने 8 लाख सब्स्क्राइबर्सचा टप्पा पार केला आहे
मुख्य म्हणजे स्वत:चा स्टुडिओ बनवणारी मराठीतील पहिलीच युट्यूबर ठरली आहे. युट्युब वर ट्रॅव्हल, लाईफ स्टाईल, स्किन केअर ते अगदी रोजच्या आयुष्यातील खास टिप्स ती देत असते.
उर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमास्तेसोबत लग्नगाठ बांधली. ती एका मुलाची आई आहे. सध्या ती आईपण एन्जॉय करतेय.