सोनू सूदचे या गावात उभारण्यात आले मंदिर, देवाप्रमाणे केली जाते त्याची पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 02:50 PM2020-12-21T14:50:06+5:302020-12-21T14:56:42+5:30

देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सतत कोरोनाने प्रभावित झालेल्या लोकांना मदत करत आहे.

देशातील 28 राज्यांमधील लोकांना मदत करणार्‍या सोनू सूदसाठी जनतेला आता काहीतरी करायचे आहे.

सोनू सूद यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन अनेकांनी त्याची मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली.

तेलंगणाच्या सिद्दीपीट जिल्ह्यात असलेल्या डब्बा टांडा गांवातल्या रहिवास्यांनी सोनू सूदच्या मंदिराची स्थापना केली आहे.

नुकते ग्रामस्थांनी मंदिराचे उद्घाटन केले.यावेळी सोनू सूदची उभारलेल्या पुतळ्या समोर त्याची देवाप्रमाणे आरतीही करण्यात आली.

महिलांनी पारंपरिक वेषभूषेत बरीच लोकगीतं गायली. सोनू सूदच्या पुतळ्यासमोर मंदिरात लोक मनोभावे पुजा करताना दिसले.

सिद्दीपेट जिला परिषद सदस्य गिरी कोंडल रेड्डी म्हणाले की, कोरोनोव्हायरस साथीच्या रोगादरम्यान सूद यांनी जनतेसाठी मोठे काम केले.

त्यांनी त्यांच्या चांगल्या कृत्यांनेच आज जनतेच्या मनात देवाचे स्थान मिळवले आहे, म्हणून आम्ही सोनू सूद यांचे मंदिर बनवले आहे.

सोनू सूद यांनी लोकांना घरी पाठवण्याशिवाय इतरही गोष्टीत मदत केली आहे. सोनू सूद यांना सरकारच्या मदतीशिवाय अनेक गावे रस्ते बनवण्यातही आपला हातभार लावला आहे.

एवढेच नव्हे तर आजही लाखो लोक अभिनेत्याकडे मदतीसाठी विचारत असतात. सोशल मीडियावर सोनू सूद जास्तीत जास्त लोकांना प्रतिसाद देतो आणि त्यांची कामेही करतो.

लॉकडाऊन दरम्यान सोनू सूदने स्वत: च्या पैशाने अनेक आजारी लोकांवरही उपचार केले आहे.

Read in English