The archies shah rukh khan advice suhana khan to the archies netflix debut
"सुहाना तू कधीच, " ‘द आर्चीज’च्या रिलीज आधी शाहरुख खानने लेकीसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 03:07 PM2022-05-16T15:07:41+5:302022-05-16T19:59:37+5:30Join usJoin usNext शाहरुख खानची लेक सुहाना खान लवकरच दिग्दर्शक झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. सोशल मीडियावर तो व्हायरल देखील झालाय. झोया अख्तरचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात लोकप्रिय कॉमिक बुक ‘द आर्चीज’चं देसी व्हर्जन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खान सुहानासाठी आनंदीत आहे. त्याने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. 'सुहाना तू कधीच परफेक्ट असणार नाहीस. हे लक्षात ठेव. पण तू फक्त तू आहेस. नेहमीच प्रमाने वाग आणि एक कलाकार म्हणून तुला जे शक्य असेल ते सर्व दे…तुझ्यावर टीका केली जाईल, तुझं कौतुक होईल पण यावर ते तुझ्यात हातात नाही.' तुला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. जेवढं शक्य असेल हसत राहा. आता लाइट कॅमेरा अॅक्शन होऊन जाऊ दे. ” श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. तीन स्टार किडस या सिनेमातून त्यांचे बॉलिवूड डेब्यू करत असल्याने हा सिनेमा चर्चेत आहे. गौरी खान हिनेही द आर्चिज या सिनेमासाठी सुहानाला शुभेच्छा दिल्या आहेत. या सिनेमातील सर्वच कलाकारांना तिने आशीर्वाद दिले आहेतटॅग्स :शाहरुख खानसुहाना खानShahrukh KhanSuhana Khan